Wednesday, May 13, 2020

तेच ते

परवा स्पृहा जोशीच्या लाईव्ह मध्ये सुबोध भावेंनी सादर केलेली कविता मनात घर करून बसली आहे. विंदांचं सादरीकरण हे त्याहून भावलं, खरंच एखाद्या कवीच्या तोंडूनच त्याची कविता ऐकणं भाग्याचं आहे.
मागील अर्धं वर्षभर नोकरी नसल्यामुळे घरीच होते तेव्हा तेच ते करून जाम कंटाळा येत असे. जेव्हा जॉब होता, तेव्हा तेच मरत मरत ट्रेन प्रवास करून जाणं, आय आय टी ला येणार्‍या रिक्षा न मिळाल्याने, पावसाने, लोकल प्रॉब्लेम मुळे उशीर होणं, उशीर होण्याची कारणंही तीच ती ऐकून सर वैतागलेले, पावसाळ्यात कुठे जवळ ट्रेक ला जावं तर तीच ती गर्दी, लांब जावं तर तीच ती बॅग, तेच ते कपडे, तोच ग्रुप, तीच माणसं. शेवटी जॉब सोडल्यावर एक नवी बॅग (ट्रेक करू लागल्यापासून पहिलीवहिली पॉश बॅग) अॉफिसमधल्या मित्रमैत्रिणींनी दिली. अजून डॅन ब्राऊनचं पुस्तक दिलेलं त्याचा नंबर लागायचाय. बॅग एक नंबर आहे, एवढे वर्ष हेच सामान का आपण न्यायचो, आता बिलकूल जड वाटत नाही तेच ते सामान ह्या बॅगेतून नेताना.
कामं खूप वाढलीयेत खरं तर लॉकडाऊन मुळे, घरचीच नाही, बाहेरचीपण. काही लिखाण, काही कोडींग सगळंच करायचंय. OS बदलायचीये, तीपण तीच ती झालेय (७ खिडक्या). दिवसभरात आणि उशीरा रात्रीपर्यंत त्याच त्या धाटणीच्या सिरियल्स पण खूप होत आहेत बघून. पण हे कवितांचं, रेणुका देशपांडेंच्या करामती पाहण्याचं आणि रात्री अनुष्का शंकरचं सतार वादन ऐकायचं मात्र नवीन आहे थोडं.
जे असतं त्या तेच ते मध्ये थोडे बदल करून तेवढंसं नवेपण आपलंसं करून घ्यायचं. आपल्याच कुठल्यातरी पुस्तकात वाचलेलं छापील ज्ञान त्याच त्या इन्स्टाग्राम सेल्फ-लव्ह पोस्ट सारखं फक्त इतरांना न सांगता जीवनात आणू पहायचं. स्वत:ल‍ थोडं कमी गृहीत धरायचं. घरी राहणं मग तेच ते वाटेनासं होतंय. सगळे सुदृढ आहोत, एकत्र आहोत म्हणून असावं. लाईव्ह मधून अनेकांच्या भेटी-संवाद होत आहेत, माणसं socially distant असली तरी personally close होत आहेत. त्यातही थोडाफार का होईना, तोच तोचपणा आणि सगळे-करतायत-म्हणून पणा आहे, हे नाकारता येत नाही.
ज्या बिचार्‍या लोकांना कोरोना मुळे क्वारंटीन केलंय कुटुंबापासून दूर, किंवा पोलिसात-दवाखान्यात असल्यामुळे कोरोना झाला आहे, त्या सर्व भाऊबंधांसाठी हा तोच तो काळ सुसह्य आणि आरोग्याकडे नेणारा जावो. लवकर बरे व्हा. जे याही परिस्थितीत खूप प्रकारे लोकांची मदत करत आहेत, त्या सर्व मेकर्स, सोशल वर्कर्स, मदतनीसांना शुभेच्छा! असंच तुमचं तेच ते उत्कृष्ट कार्य करत रहा!
You are the real heros. आम्हीच काय ते तेच ते.

Tuesday, September 10, 2019

Fast to cook, good to eat
My posts so far have been about the usual stuff, self-vents, updates, some sentimental poems, movie reviews, etc. For the few past months I have been a working wife in a homely career and education oriented family. One of my top priorities is now to make quick lunches, and I have been getting great reviews from my workmates for the हटके traditional Indian Maharashtrian recipes I used to make for tiffin. Here's one of the recipes I shared with a friend when she moved out for new job:

"पचडी" (puh-cha-dee)


This dish is a kind of salad or कोशिंबीर made from leafy vegetbles पालेभाज्या, either naturally sour or easy on the tongue, e.g.,आंबट चुका, पालक, lettuce, कोबी (cabbage), etc. It takes a very little time as there's more of mixing than cooking involved. It is rich in flavour and taste and lasts in tiffin easily over a day if the climate is cool. For hostellites, if you can manage a small fire or induction to get the tadka (फोडणी) ready, this one is a very good option to try.


Requirements:

Any leafy vegetable washed first then chopped to thin pieces,
a container to mix stuff,
ground peanuts शेंगदाणा कूट,
chopped onion,
sliced lemon,
salt, sugar, turmeric हळद, chilli powder तिखट for taste,
tadka stuff : oil, मोहरी, जिरे, कढीपत्ता 
Very small frying pan,
gas/induction.

Procedure: Mix the ingredients in container, get the tadka ready on a low flame in the order as the listed ingredients under tadka section,

Just pour the tadka over container where everything else is mixed. Mix well, add dhaniya/ pudina/ lemon optionally to enrich the taste. Take your guess for proportions, you'll be surprised about the instinctive idea you had for quantities!

Stepwise imaging:Chopping over


Mix everything!

Tadka poured


Ready to eat/pack!
No need to thank, guys! If you like this one do comment and subscribe, I'll share another one for पेरू-ओवा कोशिंबीर next week!
Tuesday, August 20, 2019

विचारवंत

मी जग बदलण्याचा केला होता एकदा प्रयत्न

वृक्षारोपण करून पाहीले, जागेवरून बाचाबाची झाली.

स्वच्छता मोहिम करायची म्हटली, घरचे म्हणाले "तेवढं कपाट आवर आधी!"

शिक्षक बनलो.
म्हटलं पुस्तकाबाहेरचंही शिकवावं,
तर दाखवली अनुक्रमणीका आणि दिली सोडचिठ्ठी पहिल्याच चाचणीपूर्वी.

माझ्या धर्मातल्या चार गोष्टी बर्‍याही वाटल्या सांगाव्याशा..
अनामिक podcast पुरतंच ते वादग्रस्त प्रकरण राहिलं बरं झालं..
बरं झालं उत्साहाच्या भरात घरावर झेंडा लावणार होतो तेवढं नाही केलं

प्लास्टिक बंदीला सहमती दर्शवली,
मुळात प्लास्टीक निर्मात्यांवर काय काय बंदी आलेय ह्या पेचात पडलो थोडासा

अमुक ठिकाणी येणार का असं रिक्षेवाल्याला 'विनम्र'पणे मातृभाषेत विचारलं
त्याच्या मातृभाषेत बहुतेक न बघितल्यासारखं करून निघून गेलं की 'नाय!' समजत असावेत.

सगळंच तिरकं होऊ लागल्यावर मग मात्र माझ्या चांगुलपणाने बंड पुकारलं

आंधळ्या काकांना पलिकडे जायचं नसतानाच रस्ता ओलांडून दिला

ट्रॅफिकमध्ये मुद्दाम self proclaimed police बनून कल्ला सोडवण्याच्या बहाण्याने उलट्याच दिशेने सोडले दुचाकीवाल्यांना

आपल्या आपल्या धर्माचं जतन करणार्‍या डोळस मूर्खांनाच म्हणू लागलो धर्मांध
वृत्तवाहिनीकडून अॉफर आली एका

मतदान सोडून इतर प्रत्येक दिवस माझे जाहीर मत आगंतुक पाहुण्यांसारखे लादू लागलो

वादात पडलो, की जिथे इतिहासाची चर्चा सुरु असेल तिथे भविष्याबद्दल आणि जिथे वर्तमान प्रश्न मांडला आहे तिथेच भूतकाळावर विषय फोडून पाहिले

जो गट मोठा, त्यांच्या बाजूचा मी झालो.

आता मला सगळे विचारवंत म्हणू लागले आहेत.


काय बोल्ता!

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे आता राहीले नाही खरे. कारण आजकाल वाकडं बोलणारी माणसंच जास्त भेटत असतात.

कुणी बोल लावतात,
कुणी बोलघेवडे असतात.
कुणाचे डोळेच जास्त बोलके असतात.
कुणाला 'तुम्हाला बोलवावे लागतेच कशाला?' ही न बोलावल्याबद्दल पळवाट सापडते.

काहींना 'काहीतरी बोला, कधीतरी' म्हणावं लागतं.
काहींच्या बोलण्याचा काही नेम नसतो.

कधी कधी बोलून बसलोय, म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात.
कधी कधी बोलता बोलता कुणाकुणात अबोला अगदी न बोलता येतो.

करणारे कमी, बोलणारेच जास्त असतात.
बोलूनचालून सगळे बोलबच्चन.
किती बोलावं या विषयावर!


Sunday, May 28, 2017

निवडक चि. व चि. सौ. कां.Radically opposite व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात, आणि मग काही काळानंतर त्यांना साक्षात्कार होतो, की radically त्रासदायक असे सगळे दुर्गुण आलेत आपल्याच पार्टनरच्या देहाच्या शामियान्यात वस्तीला! हे तसं म्हटलं तर बहुतवेळा सिनेसृष्टीने आजमावलेलं कथानक असलं, तरी लेखक-निर्देशक जोडीने चि. व चि. सौ. कां. च्या निमित्ताने आपलं वेगळेपण आणि नावीन्य सार्थ केलं आहे.

या सिनेमात मला एक महत्वाचा संदेश दिसला, तो म्हणजे equal empowerment चा. मुलगा, मुलगी दोघंही चांगल्या वृत्तीचे, सजग, सुशिक्षित सादर केले आहेत. एरवीच्या दोन बायका असणाऱ्या नवऱ्यालाही सुधारण्याच्या मागे असलेल्या बिचाऱ्या मुलीगत ती रडकी स्त्री भूमिकाही नाही, आणि एकुलता मुलगा म्हणून लाडावलेला pseudodude असा तो नायकही नाही. उलट, उच्चशिक्षण आणि नोकरीतून independence आणि work satisfaction मिळवणारे आपापल्या ठिकाणी strong असे characters उभे करून शिवाय social मीडियाचा जागरूक वापर वगैरे गोष्टी अधोरेखीत केल्या आहेत, म्हणजे सध्याच्या 'आमच्या वेळी हे असं नव्हतं' trend ला थोडा positive हादरा दिलेला आहे.

Social मीडिया च्या वापरावरून आठवलं, ह्या movieचं, पात्रांचं आणि त्यांच्या मार्केटिंग टीमचं फेसबुक, instagram, twitter सारख्या upcoming माध्यमांतून छान advertising झालेलं होतं! आपापल्या कितीतरीM followers कडून फ्री publicity मिळणं ही त्यांच्या talent ला एक प्रकारे दादच आहे. सोबत चला हवा येऊ द्या सारख्या platform वर मराठी फिल्मची गाडी येत असल्यामुळे घरोघरी प्रेक्षकांची नीरक्षीरविवेक करण्याची सोय झालेली आहे.

विशेष करून मला आज्जीचं पात्र आवडलं. या वयात आपल्यावरच्या मुलांवर संस्कार करण्याच्या जबाबदारीला पार पाडून आपण मुक्त झालेलो असतो, खासकरून त्यांच्या मुलांना घडवण्याची, योग्य ते संस्कार बिंबवण्याची ससेहोलपट पाहताना enjoy करत असतो. बहुतांश वेळा, आपल्या मुलांना अमुक करू नकोस, तमुक घालू नकोस हे म्हटलेलं असतं, पण त्यांच्या पुढच्या पिढीच्यांनी ते घालणं करणं याला खरोखर मनापासून सहमती देत असतो! माझी आज्जी म्हणायची ना, "तुम्ही ते shorts घालता ना, छान वाटतं!" ते काही आता लहान नाहीत, पण म्हातारे आहेत ना, ह्या मधल्या पिढीच्या काळजीवाहू line मधून वेगळ्या generations मधली gap छान टिपली आहे.

आपली पिढी ना, result ओरिएंटेड नाहीये, experiment oriented आहे. Trial and error बद्दल आपण औत्सुक्याने विचार करतो, हो तर हो नाही तर नाही असा attitude ठेवून. याऊलट, आपल्या आईवडिलांची generation परिणाम काय होईल ह्याच्या चिंतेत जास्त असते. त्यांच्या आधीची पिढी आपण guidance देऊ गेलो, की तो interference वाटणार हे अनुभवून शांत असते, neutral असते, आपलं personal मत तेवढं मांडते आणि विमुक्त राहते. थोडं प्रत्येक पिढीचं बरोबर असतं, पण climax आधीचा twist येईस्तोवर ते आपण समजून घेत नाही.

महत्वाचं म्हणजे प्रेक्षक म्हणून टिपायला या सिनेमात चांगल्या गोष्टी फार आहेत. कथानक जरी अतिरंजित आगळ्यावेगळ्या गुणवैशिष्ट्यांवर वर based असलं तरी मला छोट्या छोट्या गोष्टींमधून पात्रांचा दिसणारा support खूप आवडला, म्हणजे oncall स्त्री डॉक्टरला रात्री  सोडायला जाणं, धांदरटपणामुळे फुटणाऱ्या गोष्टींना सांभाळून घेणं, AC चं scheduling, एखादवेळेस आपल्या पार्टनरची वकिली करणं these little things matter boss!

परत सिनेमाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर, अभिनय सर्वांचेच उत्तम झाले आहेत. भारत गणेशपुरे यांचा ब्रह्मदेव सगळ्या pieces ची सांगड घालून छान entertain करतो. भावंडांचे संवाद, आई वडील कम सासू सासरे एकच नंबर comedy! आमटे दाम्पत्याचा छोटासा संवादसुद्धा सुखद आणि apt वाटतो. सापाचा VFX तेवढा unnecessary वाटला, बाकी प्राण्यांचा वापर उत्कृष्ट केला आहे! खरंतर कॉमेडी चित्रपटात सिरीयस स्टोरी पेक्षा कॅमेऱ्याचा वापर, फोकसिंग, वळण सगळं जास्त शिताफीनं सांभाळावं लागतं, तसं इथे चांगलं सांभाळलं आहे. Normalcy maintain होईल असं styling, मजेदार music आणि गाणी गम्मत वाढवतात. Picture सुरुवात ते शेवट, कॉमेडी-tragedy-message कुठेच पकड सोडत नाही, आणि प्रेक्षक हसतमुखाने पैसावसुल बाहेर पडतो!Friday, May 5, 2017

Ego

There are voices in my head. They kept me awake all night long.
They all tried to protect me. Made me aware of my vulnerabilities. Made me feel alone and mistreated.
They made it sound like it's us against the world, all the voices on my side.
And I was right.
They ran through my veins and pumped the memories out. Memories of being at peace. Indignant I felt.
They showed me clips from the past, threatened about how the future will look like with a shadow that succeeded the now.
I cursed my creativity. I ain't no artist. Bloody unstoppable thoughts. I felt tired.
I told myself to fall asleep. Sleep shook her head.
I stayed in denial for a while and accepted at the end of a reel projecting a generic persistent series of events.
Accepted that this is it.
The voices reassured that I was honest. The voices assured that the rest are mistaken.
I felt uncertain but I also felt confident.
Because in the past, I tried till the end.
For approvals, for compassion, for equality, to make it work. And met with judgemental assumptions in the voices from others' heads, faint screaming voices. I gave my 100%. Sometimes nothing is enough. Sometimes, the voices tell me that nothing is worthy of being so exhausted.
Because in the past, I quit. People, friends, challenges, consequences. And survived. I knew that I am happier.
Quitting wasn't a negative word when the world turned happy.
Then, the world had agreed that I was right.

Saturday, October 11, 2014

डॉ. प्रकाश आमटे: The Real Hero - एक प्रेक्षणीय चरित्रपट


शाळेत असताना मराठीच्या धड्यातून आणि Readers Digest मुलाखातीतून मी बाबा आमटेंबद्दल आणि आनंदवनाबद्दल वाचलं होतं. दुर्दैवाने त्यांची भेट घेण्यास जायची क्षमता माझ्यात येण्याअगोदरच बाबांच्या निर्वाणाची बातमी आली. यानंतर या थोर व्यक्तिमात्वाशी भेटण्याच्या संधीला आपण मुकलो, ही एवढ्या वर्षांपूर्वीची जाणीव आनंदवन आणि लोकबिरादारी बद्दल प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाने खोडून काढली. समृद्धी पोरे यांच्या 'डॉ. प्रकाश आमटे: द रीयल हीरो' मध्ये तर प्रत्यक्ष बाबाच आपल्या भेटीला येतात, केवळ बाबांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मोहन आगाशेंच्या रूपातूनच नव्हे, तर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आणि हेमालकशात घडणाऱ्या प्रत्येक सत्कार्मातून!
चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही क्षणातच आपल्याला वाघाच्या तेजस्वी सौंदर्याची प्रचिती येते, ती प्रकाश आमटेंचा एंट्री scene पाहून! पडद्यावरील आमटे बघताना 'कैसे वागणे, कैसे बोलणे, सलगी देणे कैसे असे| सकळ सुखाचा केला त्याग, करूनी साथीचे जो याग। राजसाधनाची लगबग कैशी केलि।।' हे शिवारायांबद्दलचे बोल आजही प्रशासनातून नाही, पण लोककल्याणातून महाराष्ट्र जागवून आहे असे वाटते. कधी वाचनातून, कधी मुलाखतीतून ऐकलेले अनेक प्रसंग कुठलीही घाई न करता प्रसंगाला न्याय्य वेळ योजून चितारलेले पहायला मिळतात आणि प्रेक्षक खुश होतो. काही प्रसंगी त्याग आणि dedication यांचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्यांची कसोटी का लागते, एवढ्या चांगल्या लोकांच्या वाटेला एवढ्या अडचणी येणं का नशिबात असतं हे जाणवत राहतं. त्यांच्या सुखदु:खात समरस होउन आपल्याला आपण प्रसंगानुरूप हसताना रडताना सापडतो.
अतिरंजीत थट्टा या चित्रपटात अजीबात नाही. छोट्या छोट्या गोष्टितल्या गम्मतशीर प्रसंगांतून खडतर जीवन सुसह्य करण्याचं विनोदाचं सामर्थ्य व गोष्टी lightly घेणाऱ्याचं धैर्य आणि परिपक्वता पाहताना प्रेक्षक नकळत बरंचसं शिकून जातो. Romance मधील माधुर्य, डोळसपणा, आणि सहजता पाहून 'मैं तुम्हारे लिए कुछ भी करूंगा' म्हणणाऱ्या दिखावेछाप movies पेक्षा काहीही शब्दबम्बाळ न बोलता व्यक्त होणारा एकमेकांप्रतीचा आदर, प्रेम आणि विश्वास काही औरच आहे, त्यात दोघान्नाच नाही तर इतरांनाही कायमस्वरूपी जोडून ठेवण्याची शक्ती आहे, हे चित्रित करणारे सुरेख प्रसंग सिनेमात आहेत. प्राण्यान्शी माणसाला प्रेमाने ओळख करवून देणं आणि माणसातल्या प्राण्याला समूळ बदलणं ही समाजाची मोठी गरज आहे, त्यासाठी आमटयांनी सुरु केलेल्या ark ची ही चौथी पीढ़ी असून बिनधास्त बिबट्या सोबत खेळणाऱ्या चिमुक्ल्यान्मधेही आपण त्यांना बघतो. ह्या काही आखीव रेखीवपणे टिपलेल्या moments ना सुंदर साजेशा प्रासंगीक वाक्यांच्या कोन्दणात बसवून अधिकच उठावदार बनवलं गेलंय!
तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं, तर नाना पाटेकर स्वत:च्या अनुभवातला प्रकाश साकारण्यात एकमेवाद्वितीय ठरले आहेत. Glamorous Bollywood पासून सामाजिक आणि art cinema मधील आपल्या अनुभवाची कुठलीही छाप न पाडता अगदी साधेपणाने पण तितक्याच ताकदीने सोनाली कुलकर्णी यांनीही मंदाकिनी प्रेक्षकान्पर्यंत पोहोचवली आहे. खरोखर हेमलकशातील सज्जनच नव्हे, तर सिनेमातील villains सुद्धा आपापल्या व्यक्तिरेखेत कसून रुळलेले दिसतात. अभिनयात दिग्गजान्पासून ते अक्षरश: एक्स्ट्रास पर्यंत प्रत्येकाने दाद देण्यालायक भूमिका बजावल्या आहेत. निर्मिती, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी पेलणं, तेही आमटे परिवारासारख्या नावाजलेल्या समाजसेवाकांची, हे अत्यंत आव्हानात्मक असणारच, पण समृद्धी पोरे व team यांनी ही कामगिरी चोख बजावली आहे. Location, camera, sound आणि वेशभूषा चित्रपटास पूरक आणि आल्हाददायक आहे.
या चित्रपटाची स्तुतीपर समीक्षा सर्व माध्यमातून नक्कीच वाचावयास मिळेल, यात शंका नाही. पेच फक्त एवढाच की, एका तेजस्वी सवित्याच्या प्रकाशवाटांना stars देण्यास आभाळ अपूरे पडणार आहे! As a commoner, मी या चित्रपटातून एक प्रेरणा घेणे आहे, की निव्वळ स्तुतिसुमानांच्या उधळणीपुरते नव्हे, तर शक्य त्या परीने कृतीतून स्तुती करण्याचा प्रयत्न मी करेन. 'त्याहूनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष। याउपर्याताविशेष काय ल्याहावे।।'