Radically opposite व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात, आणि मग काही काळानंतर त्यांना साक्षात्कार होतो, की radically त्रासदायक असे सगळे दुर्गुण आलेत आपल्याच पार्टनरच्या देहाच्या शामियान्यात वस्तीला! हे तसं म्हटलं तर बहुतवेळा सिनेसृष्टीने आजमावलेलं कथानक असलं, तरी लेखक-निर्देशक जोडीने चि. व चि. सौ. कां. च्या निमित्ताने आपलं वेगळेपण आणि नावीन्य सार्थ केलं आहे.
या सिनेमात मला एक महत्वाचा संदेश दिसला, तो म्हणजे equal empowerment चा. मुलगा, मुलगी दोघंही चांगल्या वृत्तीचे, सजग, सुशिक्षित सादर केले आहेत. एरवीच्या दोन बायका असणाऱ्या नवऱ्यालाही सुधारण्याच्या मागे असलेल्या बिचाऱ्या मुलीगत ती रडकी स्त्री भूमिकाही नाही, आणि एकुलता मुलगा म्हणून लाडावलेला pseudodude असा तो नायकही नाही. उलट, उच्चशिक्षण आणि नोकरीतून independence आणि work satisfaction मिळवणारे आपापल्या ठिकाणी strong असे characters उभे करून शिवाय social मीडियाचा जागरूक वापर वगैरे गोष्टी अधोरेखीत केल्या आहेत, म्हणजे सध्याच्या 'आमच्या वेळी हे असं नव्हतं' trend ला थोडा positive हादरा दिलेला आहे.
Social मीडिया च्या वापरावरून आठवलं, ह्या movieचं, पात्रांचं आणि त्यांच्या मार्केटिंग टीमचं फेसबुक, instagram, twitter सारख्या upcoming माध्यमांतून छान advertising झालेलं होतं! आपापल्या कितीतरीM followers कडून फ्री publicity मिळणं ही त्यांच्या talent ला एक प्रकारे दादच आहे. सोबत चला हवा येऊ द्या सारख्या platform वर मराठी फिल्मची गाडी येत असल्यामुळे घरोघरी प्रेक्षकांची नीरक्षीरविवेक करण्याची सोय झालेली आहे.
विशेष करून मला आज्जीचं पात्र आवडलं. या वयात आपल्यावरच्या मुलांवर संस्कार करण्याच्या जबाबदारीला पार पाडून आपण मुक्त झालेलो असतो, खासकरून त्यांच्या मुलांना घडवण्याची, योग्य ते संस्कार बिंबवण्याची ससेहोलपट पाहताना enjoy करत असतो. बहुतांश वेळा, आपल्या मुलांना अमुक करू नकोस, तमुक घालू नकोस हे म्हटलेलं असतं, पण त्यांच्या पुढच्या पिढीच्यांनी ते घालणं करणं याला खरोखर मनापासून सहमती देत असतो! माझी आज्जी म्हणायची ना, "तुम्ही ते shorts घालता ना, छान वाटतं!" ते काही आता लहान नाहीत, पण म्हातारे आहेत ना, ह्या मधल्या पिढीच्या काळजीवाहू line मधून वेगळ्या generations मधली gap छान टिपली आहे.
आपली पिढी ना, result ओरिएंटेड नाहीये, experiment oriented आहे. Trial and error बद्दल आपण औत्सुक्याने विचार करतो, हो तर हो नाही तर नाही असा attitude ठेवून. याऊलट, आपल्या आईवडिलांची generation परिणाम काय होईल ह्याच्या चिंतेत जास्त असते. त्यांच्या आधीची पिढी आपण guidance देऊ गेलो, की तो interference वाटणार हे अनुभवून शांत असते, neutral असते, आपलं personal मत तेवढं मांडते आणि विमुक्त राहते. थोडं प्रत्येक पिढीचं बरोबर असतं, पण climax आधीचा twist येईस्तोवर ते आपण समजून घेत नाही.
महत्वाचं म्हणजे प्रेक्षक म्हणून टिपायला या सिनेमात चांगल्या गोष्टी फार आहेत. कथानक जरी अतिरंजित आगळ्यावेगळ्या गुणवैशिष्ट्यांवर वर based असलं तरी मला छोट्या छोट्या गोष्टींमधून पात्रांचा दिसणारा support खूप आवडला, म्हणजे oncall स्त्री डॉक्टरला रात्री सोडायला जाणं, धांदरटपणामुळे फुटणाऱ्या गोष्टींना सांभाळून घेणं, AC चं scheduling, एखादवेळेस आपल्या पार्टनरची वकिली करणं these little things matter boss!
परत सिनेमाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर, अभिनय सर्वांचेच उत्तम झाले आहेत. भारत गणेशपुरे यांचा ब्रह्मदेव सगळ्या pieces ची सांगड घालून छान entertain करतो. भावंडांचे संवाद, आई वडील कम सासू सासरे एकच नंबर comedy! आमटे दाम्पत्याचा छोटासा संवादसुद्धा सुखद आणि apt वाटतो. सापाचा VFX तेवढा unnecessary वाटला, बाकी प्राण्यांचा वापर उत्कृष्ट केला आहे! खरंतर कॉमेडी चित्रपटात सिरीयस स्टोरी पेक्षा कॅमेऱ्याचा वापर, फोकसिंग, वळण सगळं जास्त शिताफीनं सांभाळावं लागतं, तसं इथे चांगलं सांभाळलं आहे. Normalcy maintain होईल असं styling, मजेदार music आणि गाणी गम्मत वाढवतात. Picture सुरुवात ते शेवट, कॉमेडी-tragedy-message कुठेच पकड सोडत नाही, आणि प्रेक्षक हसतमुखाने पैसावसुल बाहेर पडतो!
No comments:
Post a Comment