Tuesday, August 20, 2019

काय बोल्ता!

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे आता राहीले नाही खरे. कारण आजकाल वाकडं बोलणारी माणसंच जास्त भेटत असतात.

कुणी बोल लावतात,
कुणी बोलघेवडे असतात.
कुणाचे डोळेच जास्त बोलके असतात.
कुणाला 'तुम्हाला बोलवावे लागतेच कशाला?' ही न बोलावल्याबद्दल पळवाट सापडते.

काहींना 'काहीतरी बोला, कधीतरी' म्हणावं लागतं.
काहींच्या बोलण्याचा काही नेम नसतो.

कधी कधी बोलून बसलोय, म्हणून काही गोष्टी कराव्याच लागतात.
कधी कधी बोलता बोलता कुणाकुणात अबोला अगदी न बोलता येतो.

करणारे कमी, बोलणारेच जास्त असतात.
बोलूनचालून सगळे बोलबच्चन.
किती बोलावं या विषयावर!


No comments:

Post a Comment