Friday, April 6, 2012

Conversations :)

I believe, that "सुरूवात काय.. शेवट काय.. आनंद आहे सगळा!" is the story of every romantic conversation. And no smileys can catch on with the pace of expression-changes in any of them.


***************
खर सांगू का? परवा एवढ फारस काही विशेष भांडणपण झाल नव्हत. मी आपल उगाच नखरे करायचे म्हणून थोडस चिडल्यासारख दाखवल. नाही म्हणजे, मी मुद्दाम नाटक करतेय हे न कळण्याइतकाही हा माठ नाहीये तसा; पण नाटक करण्याचा मक्ता मीच घेतला नाहीये हे मला कळण्याइतपत  acting  त्यालाही जमते. तर, अशी छोटी-मोठी भांडण उगवली, की शिस्तीत मी म्हणतेय तस वागाव आणि मोकळ व्हाव किनई? पण नाही. "आज भांडणाचा मूड आहे", म्हणे, "किती दिवस फक्त गोड गोड बोलतोय आपण, चल, आज मस्तपैकी भांडूयात."


"वा रे वा! तुला हव तेंव्हा भांडायाच, तुला हव  तेंव्हा  गोड बोलायच ना मी, मला तर काही स्वत:चा  option च नाहीये जस काई, huh!"


"च्यायला! म्हटल भाण्डू, तर सुरू लगेच! नौटंकी :P
हुन्ड्यात सहानशक्तीच मागणारे मी तुझ्या बाबांकडून!"


"ओये! बाप पे नही जानेका, क्या?!"


"नाटकी बाई :P"


"बाई असेल तुझी आई! :@"


"आता तू आई वर गेलेल चालत वाटत!"


"मला सगळ माफ आहे. सहन कर."


"Hmph.. आलीया भोगासी..."


"हो. नसेन तेंव्हाच कळेल किंमत." 


"परत अस बोलू नकोस."


****************


Note:
Fiction. The girl talks a lot like me, but fiction. Okay, now I think I tried to explain too much. :|

No comments:

Post a Comment