Saturday, December 17, 2011

It's not like I don't love Love! :)



प्रेमाची एक भाषा आहे,
अलगद अलगद उमलणारी,
कळत नकळत उमजणारी,
गुमसुम असतानाही बोलणारी..


फसवा राग दाखवणारी,
रुसव्यात मनोमन हसणारी,
गाता गाता मध्येच एक
हळुवार हरकत घेणारी..


साम्य एकही नसतानापण
तासंतास बोलणारी,
कट्ट्यावरच्या गप्पांखातर
२-३ trains  सोडणारी..
डोळ्यांतून मागे सारलेला
क्षणिक अश्रूही टिपणारी,
हाताच्या त्या स्पर्शाला 
आपल्या हातात जपणारी..


मुसळधार पावसात
काळजीने phone करणारी,
वेड्या इप्सितांसाठी
वेड्यासारखी झटणारी,
लाल-गुलाबी थंडीमध्ये
पावसासारखी बरसणारी,
मावळतीच्या क्षणी
समुद्रावर भटकणारी..


तुला त्रास झाला की
जवळ घेणारी माझी कुशी,
उगाच अवेळी डोकं टेकायला
तुझ्या खांद्याची उशी,
अनंतावर विश्वास ठेवताना
मनात सारं हरवण्याची भीती,
भीतीला दूर सारण्यासाठी 
जवळ असावी तुझी मिठी..


प्रेमाच्या ह्या भाषेचं grammar 
जमेल आपल्यालाही कधीतरी,
meaning एकट्या तुलाच कळेल
sentence माझं चुकलं तरी..   

1 comment: