Thursday, January 30, 2014

बर्‍याच दिवसांनी म्हटलं लिहू :)

सरावाच्या मूक भावना
साठवल्या किती मनी,
प्रश्न निरूत्तर बरा,
मना नकाराची भीती.

जमलेल्या मंडळींच्या
मुक्तछंद गुजगोष्टी
कान एकाग्र ऐकण्या
तुझ्या शब्दांच्या चाहूली

धडधडीची चाल
तुझ्या हाकेला निराळी
तुला हाक मारू जाता
मनोमन गुदगुली

सांजवेळी माझ्यापुढे
आठवणीची साउली,
खिडकीतुनी खुणावे
वाट तुझी तिन्ही काळी

कोण्या कारणा, का वाटे
मला तुझी रे काळजी
काय हक्काने पुसावी
अशी तुझी मी खुशाली

तू सुखाचा कबीर,
मी शब्दांची गरीब,
तुझ्या होकारास का रे
माझे पारखे नशीब.

की तू अजुन अबोल
जरी हेच तुझ्या मनी,
स्वप्नं पुरी होण्यासाठी
वाट पाहे समदुख्खी.

4 comments:

  1. तू सुखाचा कबीर,
    मी शब्दांची गरीब,
    तुझ्या होकारास का रे
    माझे पारखे नशीब.


    Kamaaal ahet ya oli ! Kamaal !
    Wah!

    Found this blog at IH website but it seems u don't post much here

    ReplyDelete