Saturday, November 24, 2012
सोप्पं नसतं हे च्यायला!
लिहून काढू सगळं म्हटलं एकदाचं,
तर शब्दांचा नेमका असहकार!
नाही, नकोच हा topic ठरवलं,
की गद्य-पद्यात overlapping अनंत विचार!
चित्र आपलं मनातलं माझ्या
बघच एकदा माझ्या डोळ्यांनी,
focus आपल्या smiling चेहर्यांवर
जगावर मारुन smudge आणि.
एकमेकांत हरवलेली नजर आपली,
त्या क्षणात जपून ठेवाविशी,
Forever ची senti भाषा
डोळ्यात वाचता येईल अशी..
Screenshot काढून save केलाय,
आठवण काढून बघत बसायला
तन्द्री तोडणारं डोळ्यातल पाणी
कराराने मागे सारायला.
Understanding छान जमेल मला,
नाहीत अवास्तव अपेक्षा..
स्वतंत्र, मुक्तच असतं relation..
ईतनी बुरी भी नहीं मैं, बस क्या!
स्वत:ला खूप protect केलेलं,
Feelings नकोत हाच होता ठराव..
तरी कळलंच नाई कधी पलटलं
इतका effortless साला मनाचा डाव..
वरवर सगळ्यांसमोर कळू न देता हसत बोलण्याचं शहाणपण आहे..
आतल्या आत रडण थांबवणं मग डोक्यालाही पार अशक्य का हे!
तक्रार म्हणून नाई सांगते सगळं,
खरच मत बदलून बघ ना एकदा..
म्हणशील तेवढी वाट बघेन मी, पण
सोप्पं नसतं हे च्यायला!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Wow... This is damn good. I am sharing this. Keep it up. :)
ReplyDelete//तक्रार म्हणून नाई सांगते सगळं,
ReplyDeleteखरच मत बदलून बघ ना एकदा..
Simply amazing! Keep writing!
Aani ho kharach, sopp nasta he chyayla!
Pray for me.. Hope he would say yes soon! ^_^
ReplyDeleteend is just too awesome :)
ReplyDelete