असाव एक inequality,
कधी जरा गर्दीत,
तर कधी थोड़ी एकटी.
जरास्स हट्टी 'मी' पण,
कधी धूसर वाटणारं..
कधी अगदी स्पष्ट,
बेधुँदपणे स्वत्व विसरणारं..
स्वच्छ आकाशात अचानक
पावसाची रिप रिप,
गुलाबी थंड रात्र चाळवणारी
कधी उन्हाची तिरीप.
थोडस हासू,

पानगळिच्या वेळीसुद्धा
बहरतो हा ऋतु..
कधी सकारात्मक pessimistic,
थोडा negatively आशावादी,
कधी सुप्त सन्थ संयमी,
थोडा बण्डखोरीचा फिर्यादी.
खट्याळ अवखळ गाम्भीर्य याच,
विचित्रच्चे जणू!
अधूनच एवढस्स गोड,
आणि मधूनच तेवढस्स कडू !
No comments:
Post a Comment