Saturday, September 8, 2012

माझ्या Boyfriend च्या अंगभूत कला


प्रवासात माझ्या शेजारची जागा  setting  लावून अडवलेली,
पावसात एकत्र भिजताना नेहमी, छत्री याची हरवलेली!
पोट दुखेस्तवर ह्सताना, मला बघून हसत बसतो,
वेड्यासारखा रात्र रात्र  smilies  मध्ये बोलत असतो!

कधीतरी तन्द्रित मी शून्यात बघताना बघून चिडवतो,
गप्प गप्प दिसले तर काळजीने 'काय झाल ग!' विचारतो..

मनातली काळजी चेह~यावर उलगडली,
की ताबडतोब भाव बदलतात याचे!
हिच्या नजरेतून थोडेच चुकणारे, हे लक्षात आल की खजिल होतो!

मी खोट खोट रागावाव म्हणून नेहमी माझी कळ काढतो,
खरच चुकून रागावले, की नेहमीचेच जोक मारुन हसवतो.
गोड ए तसा.. म्हणून करते नेहमी मी पण माफ लगेच,
काय करणार! याचे वेडे प्रयत्न पाहून रागच नेहमी सापडेनासा होतो!

हल्ली हल्ली अक्षरशः नको तितका  possessive  झालाय,
जरा जास्त बोलले कुणा मुलाशी तर दिवसभर न बोलता बसलाय!
आगाउपणे अती डेरिंग करायला गेले परवा, तर किती मला ओरडलाय!
हज्जार त~हा या मुलाच्या!
खरच मोठ्यांसारखा वागू लागलाय..

टीनेजर्स सारखे  affair  चे चोचले-मस्ती, तितका कै आमच्यात नाही..
जाणीव असते फक्त, आठवून हळूवार हसण्यासारख आहे काही..
सवयच लागलेय आता आम्हाला.. एकमेकांच्या असण्याची..
15-एक मिनटांच्या भेटीखातर विनतक्रार तासन्तास वाट बघण्याची!

5 comments:

 1. Any chance of getting a translation? Just looking at all the Devanagari script in a browser makes my head ache.

  ReplyDelete
  Replies
  1. Ah! Sorry.. I'll take care of writing in English from next post.

   Delete
 2. मराठीतच लिहा !!
  अशा गोष्टी इंग्रजीत लिहिल्या ना तर चव जाईल सगळी

  ReplyDelete
 3. Hehe nice one...So love is in air! Congrats :)

  ReplyDelete