Showing posts with label Dr. Prakash Amte : The Real Hero Review. Show all posts
Showing posts with label Dr. Prakash Amte : The Real Hero Review. Show all posts

Saturday, October 11, 2014

डॉ. प्रकाश आमटे: The Real Hero - एक प्रेक्षणीय चरित्रपट


शाळेत असताना मराठीच्या धड्यातून आणि Readers Digest मुलाखातीतून मी बाबा आमटेंबद्दल आणि आनंदवनाबद्दल वाचलं होतं. दुर्दैवाने त्यांची भेट घेण्यास जायची क्षमता माझ्यात येण्याअगोदरच बाबांच्या निर्वाणाची बातमी आली. यानंतर या थोर व्यक्तिमात्वाशी भेटण्याच्या संधीला आपण मुकलो, ही एवढ्या वर्षांपूर्वीची जाणीव आनंदवन आणि लोकबिरादारी बद्दल प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाने खोडून काढली. समृद्धी पोरे यांच्या 'डॉ. प्रकाश आमटे: द रीयल हीरो' मध्ये तर प्रत्यक्ष बाबाच आपल्या भेटीला येतात, केवळ बाबांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मोहन आगाशेंच्या रूपातूनच नव्हे, तर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे आणि हेमालकशात घडणाऱ्या प्रत्येक सत्कार्मातून!
चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही क्षणातच आपल्याला वाघाच्या तेजस्वी सौंदर्याची प्रचिती येते, ती प्रकाश आमटेंचा एंट्री scene पाहून! पडद्यावरील आमटे बघताना 'कैसे वागणे, कैसे बोलणे, सलगी देणे कैसे असे| सकळ सुखाचा केला त्याग, करूनी साथीचे जो याग। राजसाधनाची लगबग कैशी केलि।।' हे शिवारायांबद्दलचे बोल आजही प्रशासनातून नाही, पण लोककल्याणातून महाराष्ट्र जागवून आहे असे वाटते. कधी वाचनातून, कधी मुलाखतीतून ऐकलेले अनेक प्रसंग कुठलीही घाई न करता प्रसंगाला न्याय्य वेळ योजून चितारलेले पहायला मिळतात आणि प्रेक्षक खुश होतो. काही प्रसंगी त्याग आणि dedication यांचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्यांची कसोटी का लागते, एवढ्या चांगल्या लोकांच्या वाटेला एवढ्या अडचणी येणं का नशिबात असतं हे जाणवत राहतं. त्यांच्या सुखदु:खात समरस होउन आपल्याला आपण प्रसंगानुरूप हसताना रडताना सापडतो.
अतिरंजीत थट्टा या चित्रपटात अजीबात नाही. छोट्या छोट्या गोष्टितल्या गम्मतशीर प्रसंगांतून खडतर जीवन सुसह्य करण्याचं विनोदाचं सामर्थ्य व गोष्टी lightly घेणाऱ्याचं धैर्य आणि परिपक्वता पाहताना प्रेक्षक नकळत बरंचसं शिकून जातो. Romance मधील माधुर्य, डोळसपणा, आणि सहजता पाहून 'मैं तुम्हारे लिए कुछ भी करूंगा' म्हणणाऱ्या दिखावेछाप movies पेक्षा काहीही शब्दबम्बाळ न बोलता व्यक्त होणारा एकमेकांप्रतीचा आदर, प्रेम आणि विश्वास काही औरच आहे, त्यात दोघान्नाच नाही तर इतरांनाही कायमस्वरूपी जोडून ठेवण्याची शक्ती आहे, हे चित्रित करणारे सुरेख प्रसंग सिनेमात आहेत. प्राण्यान्शी माणसाला प्रेमाने ओळख करवून देणं आणि माणसातल्या प्राण्याला समूळ बदलणं ही समाजाची मोठी गरज आहे, त्यासाठी आमटयांनी सुरु केलेल्या ark ची ही चौथी पीढ़ी असून बिनधास्त बिबट्या सोबत खेळणाऱ्या चिमुक्ल्यान्मधेही आपण त्यांना बघतो. ह्या काही आखीव रेखीवपणे टिपलेल्या moments ना सुंदर साजेशा प्रासंगीक वाक्यांच्या कोन्दणात बसवून अधिकच उठावदार बनवलं गेलंय!
तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं, तर नाना पाटेकर स्वत:च्या अनुभवातला प्रकाश साकारण्यात एकमेवाद्वितीय ठरले आहेत. Glamorous Bollywood पासून सामाजिक आणि art cinema मधील आपल्या अनुभवाची कुठलीही छाप न पाडता अगदी साधेपणाने पण तितक्याच ताकदीने सोनाली कुलकर्णी यांनीही मंदाकिनी प्रेक्षकान्पर्यंत पोहोचवली आहे. खरोखर हेमलकशातील सज्जनच नव्हे, तर सिनेमातील villains सुद्धा आपापल्या व्यक्तिरेखेत कसून रुळलेले दिसतात. अभिनयात दिग्गजान्पासून ते अक्षरश: एक्स्ट्रास पर्यंत प्रत्येकाने दाद देण्यालायक भूमिका बजावल्या आहेत. निर्मिती, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी पेलणं, तेही आमटे परिवारासारख्या नावाजलेल्या समाजसेवाकांची, हे अत्यंत आव्हानात्मक असणारच, पण समृद्धी पोरे व team यांनी ही कामगिरी चोख बजावली आहे. Location, camera, sound आणि वेशभूषा चित्रपटास पूरक आणि आल्हाददायक आहे.
या चित्रपटाची स्तुतीपर समीक्षा सर्व माध्यमातून नक्कीच वाचावयास मिळेल, यात शंका नाही. पेच फक्त एवढाच की, एका तेजस्वी सवित्याच्या प्रकाशवाटांना stars देण्यास आभाळ अपूरे पडणार आहे! As a commoner, मी या चित्रपटातून एक प्रेरणा घेणे आहे, की निव्वळ स्तुतिसुमानांच्या उधळणीपुरते नव्हे, तर शक्य त्या परीने कृतीतून स्तुती करण्याचा प्रयत्न मी करेन. 'त्याहूनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष। याउपर्याताविशेष काय ल्याहावे।।'